Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जातीअंता शिवाय बाबासाहेबांना अपेक्षित धर्मक्रांती होणार नाही- प्रा. डॉ. संबोधी देशपांडे

जळगाव, प्रतिनिधी | जातीव्यवस्थेचे पायमुळे समाजात खोलवर रुजले आहेत. भारतात जातीवरून माणसांची ओळख होते. तथागत बुध्दांनी दिलेला समतेचा मार्ग हा मानवी कल्याणाचा आहे. याचसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला. मात्र, जातीअंता शिवाय बाबासाहेबांना अपेक्षित धम्मक्रांती होऊ शकणार नाही असे विचार प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी व्यक्त केले. त्या धम्मक्रांती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्प बचत भवन सभागृहात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त “माझ्या विचारांवर बुद्ध धर्माचा प्रभाव”या विषयावर प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांचे व्याख्यान धम्मक्रांती महोत्सव समितीने आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जन क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे होते. प्रसिद्ध विधी तज्ञ राजेश झाल्टे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ.समृद्धी देशपांडे यांनी स्त्रीपुरुष समतेची पायाभरणी बुद्धाच्या धम्मात असून प्रस्तापित धर्मव्यवस्था जातीचे पालन करण्यास शिकवत असल्याने विषमता निर्माण झाली आहे. आंतरजातीय विवाहामुळे जात निर्मूलन करता येते, मात्र धर्मांध अभिमान आंतरजातीय विवाह मान्य करीत नाही असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, महिलांची मासिक पाळी नैसर्गिक आहे. माणसांचा जन्म मासिक पाळीच्या रचनेतच होत असताना मासिक पाळी ही अपवित्र ठरवली जाते. मात्र बुद्ध धम्मात मासिक पाळीच्या काळातही महिला बुद्ध विहारात जाऊ शकतात अशी समता अन्य धर्मात दिसत नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्यासाठी नागपूर शहर का निवडले याचे विविध दाखले देऊन आपण सर्व नागवंशी असून तथागताचा धम्म हा व्यक्ती स्वातंत्र्य देणारा आहे असे विचार मांडले. याप्रसंगी मंचावर शिक्षण विस्ताराधिकारी रविकिरण बिऱ्हाडे, डॉ. प्रकाश वानखेडे, भारत ससाणे, राजेश पाटोळे, सचिन बिऱ्हाडे, अनिल सुरडकर, ललित मेहरे, माया अहिरे, सुरेश सोनवणे, राजू मोरे, चंदन बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ममता सपकाळे, प्रियंका सपकाळे, प्राची बिऱ्हाडे, आदिती भालेराव, भाग्यश्री उबाळे या मुलींनी बुद्ध वंदना म्हटली. यावेळी “मी सावित्री बोलतेय” ही नाट्यछटा कु. चांदणी सूर्यवंशी यांनी सादर केली.प्रास्ताविक प्रा. प्रीतीलाल पवार यांनी तर सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.आभार
कार्यक्रमास प्रा. डॉ. सी. पी. लभाणे, मिलिंद केदार, प्रकाश दाभाडे, प्रा.वानखेडे, नितीन मौर्य, उदय सपकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी भारत सोनवणे, जगदीश सपकाळे, समाधान सोनवणे, जयपाल धुरंधर, वाल्मीक सपकाळे, सुधाकर सपकाळे, नीलेश बोरा, नाना मगरे, गौतम सोनवणे, विशाल सोनवणे, रंजना तायडे, वृषाली सोनवणे, दिलीप त्र्यंबक सपकाळे, सुभाष सपकाळे, दिलीप अहिरे, युवराज सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, युवराज सुरवाडे, नीलू इंगळे, संजय सपकाळे, ज्योती वाघ, दिव्या तायडे, रक्षा भालेराव, गौतम सोनवणे आदिंनी‌ परिश्रम घेतले.

Exit mobile version