जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या: पतीसह सासूला ७ वर्षाची शिक्षा

भुसावळ प्रतिनिधी । नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील विवाहितेचा पतीसह सासूकडून होणाऱ्या छाळाला कंटाळून विवाहितेने विष घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात पतीसह सासूविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीसह सासूला दोषी ठरवत सात वर्ष शिक्षा आणि दंड सुनवला आहे.

या खटल्याची पार्श्‍वभूमी अशी की, तक्रारदार पार्वताबाई वसंता खराटे (रा.आलमपूर, ता.नांदुरा, जि.बुलढाणा) यांची कन्या यशोदा उर्फ योगीता अनिल खोंदले (25) हिचा 2011 मध्ये चिंचखेडा येथील अनिल तुकाराम खोंदले यांच्याशी विवाह झाला होता. पार्वताबाई यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांची शेती बुडीत क्षेत्रात गेल्याने शासनाकडून त्यांना सात लाखांची भरपाई मिळाली होती ही बाब खोंदले कुटुंबियांना कळाल्याने त्यांनी यशोदाचा लग्नानंतर घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत म्हणून सातत्याने शिवीगाळ व मारहाण करून छळ सुरू केला होता. मुलीचा होणारा छळ पाहता पार्वताबाई यांनी खोंदले कुटुंबियांना 50 हजार रुपये दिल्यानंतर जानेवारी 2017 मध्ये मुलीला नांदवण्यासाठी नेण्यात आले मात्र छळ कायम सुरू राहिला. छळ असह्य झाल्याने 16 मार्च 2017 रोजी सकाळी यशोदाने आपल्या आईला फोन करून त्रासाची माहिती देत माहेरी नेण्याची विनंती केली होती तर दुपारी चुलत दीर विकास खोंदले यांनी यशोदाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. सुरुवातीला मयत विवाहितेच्या पतीने मुक्ताईनगर पोलिसात पत्नी संतापी असल्याचे सांगत ती नेहमीच भांडण करीत असल्याने तिने संतापात कापसावर फवारणीचे कीटकनाशक प्राशन केल्याचे भासवत मुक्ताईनगर पोलिसात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

Protected Content