Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक लोकाधिकार जनजागरण मंचतर्फे गरजुंना किटचे वाटप

 

भुसावळ, प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे दि. २४ मे रोजी जागतिक लोकाधिकार जनजागरण मंचतर्फ़े गरजुंना खाद्य किटचे वाटप करण्यात आले.

जागतिक लोकाधिकार जनजागरण मंचचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अभिजित अ.मेने यांच्या सौजन्याने नगरातील गरजू १०२ कुटूंबना प्रत्येकी ५ किलो गहू पीठ, १लिटर तेल, १किलो मीठ, २ किलो कांदा,अर्धा किलो मसाला पॅकेट,१ साबण पॅकेट असे एकूण १०२ किटचे वाटप करण्यात आले. किटचे वाटप करतांना शासनाचे गाईडलाइन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यशस्वीतेसाठी, हेमंत खरात, टीटू मेहरा, मुन्ना अवस्ती, दिनेश अग्रवाल, अशोक पवार, वरुण अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version