जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी डिसले !

मुंबई प्रतिनिधी । ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे. त्यामध्ये बार्शीच्या डिसले गुरुजींचा समावेश आहे.

या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

Protected Content