Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने परिचारिका व डॉक्टरांचा सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । आज १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने धर्मरथ फाऊंडेशन व कुसुमताई फाऊंडेशनतर्फे शिवाजी नगर मधील म.न.पा रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार असोत किंवा अन्य आजार असताना केवळ रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून कुटुंबाची काळजी न करता जीवाची बाजी लावून युद्धभूमीवर पाय रोवून रणरागिणी परिचारिका लढा देत असतात. डॉक्टरांनी उपचार देऊन झाल्यानंतर रुग्णांची संपूर्ण सुश्रुषा करण्याचं महत्वाचं काम या परिचारिका करत असतात. डॉक्टरांपेक्षा रुग्ण हा जास्त वेळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो. कोरोनासारख्या महाभयंकर युद्धात सर्व परिचारिका ह्या त्याला नमवण्यासाठी दिवस रात्र योगदान देत आहेत. अशा सर्व नर्सेस योध्यांना धर्मरथ फाउंडेशन व कुसुमताई फाउंडेशनतर्फे त्यांना संपुर्ण चेहरा सुरक्षा किट व गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार व शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी उपस्थित धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे, संतोष भीताडे, डॉ.तिलोत्तमा गाजरे, डॉ. भारंबे मॅडम हे होते. त्याचवेळी सर्व नर्सेस व डॉक्टरांनी धर्मरथ फाउंडेशनचे आभार मानले.

Exit mobile version