Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक आदीवासी दिनी समाज बांधवांनी सहभाग घ्यावा- प्रभाकर सोनवणे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदीवासी दिनी ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या दिनी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले.

 

यावल तालुका आदीवासी टोकरे कोळी सामाज बांधवाची बैठक यावल खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ९ आँगस्ट २०२२ रोज मंगळवारी  जागतिक आदीवासी दिन असुन , या जागतीक आदीवासी दिन साजरा करण्या बाबत बैठकीत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. पुढीलप्रमाणे राहणार आहे आदीवासी दिनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन यावल येथील जिनींग प्रेस सभागृहा पासून तर धनश्री टाँकीज पर्यत आदीवासी बांधवांच्या पारंपारिक वेशभुषा सजीव देखावा काढुन आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा विषय सर्वाचा मते मंजूर करुन उत्सव समीतीचा अध्यक्षपदी नंदुभाऊ सोनवणे  रिधुरी प्र वढोदा  तर उपाध्यक्षपदी गोटुभाऊ साळुंखे यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच परीषदचे तालुकाध्यक्ष व वढोदा सरपंच संदिप सोनवणे, समाधान सोनवणे थोरगव्हाण प्रमोद कोळी यावल, इश्वर कोळी यावल,खेमचंद कोळी पाडळसा, गोकुळ कोळी मनवेल, नामदेव कोळी अकलुद,योगेश कोळी, पिंपरुळ,प्रविण कोळी सांगवी खुर्द , सागर कोळी, संदिप कोळी, अनिल कोळी, नितीन कोळी अंजाळे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version