Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जस्टीस फॉर सुशांत सिंह राजपूत ; कॅलिफोर्नियात लागले होर्डिंग !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांतची बहीण श्वेताने कॅलिफोर्नियातील एका होर्डिंगचा व्हिडीओ शेअर केला. ज्यावर Justice For Sushant Singh Rajput… असे लिहिलेले आहे. यानिमित्ताने सुशांतचे परदेशातील फॅन्सही त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

 

कॅलिफोर्नियातील होर्डिंगवरून सुशांतचे फॅन्स केवळ भारतातच नव्हते तर जगभरात असल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्नियातील सुशांतचे फॅन्सही न्यायाची मागणी करत असून सुशांतची बहिण श्वेताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘ही वर्ल्डवाइड मुव्हमेंट आहे’.तसेच आणखी एक व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, ‘सुशांत तू आमच्या हृदयात धडधडत आहे’. दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीची ईडीने तब्बल आठ तास चौकशी केली होती. परंतू या चौकशीत अभिनेता रिया चक्रवर्तीने बहुतांश प्रश्नांचे उत्तर एकतर ‘मला माहित नाही’ किंवा ‘मला कसे तरी होतेय’, असे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version