जळगाव शहरातील विविध संघटनेच्या वतीने मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारा दि केराला स्टोरी हा चित्रपट तसेच एनसीआरटी या संस्थेने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या माहितीवर आधारित पाठ हटवल्याच्या निषेधार्थ आणि संविधानाची शपथ घेऊन त्याच संविधानाबद्दल बोलणाऱ्या आमदार व खासदार यांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी जळगाव शहरातील विविध संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले आहे

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी काळात येणारा “दी केरला स्टोरी” या चित्रपटात एका समाजातील महिला व तरुणी यांच्या बद्दल हेतू पुरस्कर मोठ्या प्रमाणावर देश विरोधात घातक कारवाई करण्यासाठी अतिरेकी संघटनेमध्ये जात असल्याची खोटी माहिती चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्या कारणामुळे हा चित्रपटात राज्यात कुठेही प्रदर्शित होऊ नये, याला विरोध केला आहे तसेच एनसीआरटी या संस्थेने भारताचे पहिले शिक्षणमंत्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत भारताचे संविधान बनवणारी समिती सदस्य मौलाना अबुल कलाम आझाद यांची माहितीवर आधारित पाठ आश्चर्यजनकरीत्या हटविल्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा निषेध व्यक्त केला आहे आणि खासदार साक्षी महाराज, खासदार सांध्वी ठाकूर आणि इतर आमदार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हात ठेवून शपथ घेतात, आणि त्याच संविधानाची उघडपणे भाषणात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न केला जात आहे, अशा आमदारांना आणि खासदारांना अपात्र करण्यात यावे, या मागणीसाठी जळगाव शहरातील विविध संघटनेच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Protected Content