Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव विमानतळ जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जळगाव विमानतळासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाच्या धडकेत अज्ञात प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुसूंबा गावाजवळील विमानतळाजवळ रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ ते ६० वर्षीय प्रौढ जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाली. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी इमरान रहिम बेग यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. दरम्यान त्या प्रौढाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याच्या डाव्या पायाचा चेंदामेंदा झाला होता तर उजव्या पायाचे हाड मोडलेले होते. पोलीसांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अज्ञात वाहन चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन निष्काळजीपणे चालवून इसमाला धडक दिली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version