Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील एका दूध डेअरीच्या ओट्यावर बसलेल्या बारा वर्षीय बालिकेचा एका इसमाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बालिका ही शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दूध डेअरीच्या ओट्यावर बसलेली होती़ बाजूला एक अनोळखी इसम हा बसलेला होता. त्याने त्या बालिकेचा विनयभंग केला़ हा प्रकार छावा मराठा युवा महासंघाचे भैय्या पाटील व त्यांच्या मित्रांना दिसला. त्यांनी त्या इसमाला चोप दिला़ अखेर शनिवारी या प्रकरणी पिडित बालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बालिका ही भिक मागून उदरनिर्वाह करते.

Exit mobile version