Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव रेल्वे स्थानकात धान्याची मालगाडी फोडली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकवर उभी असलेली धान्याची मालगाडी फोडून धान्याचे पोते लुटून नेल्याचा प्रकार आज रात्री ९वाजेच्या सुमारास घडला. यात परिसरातील लोकांनी धान्यावर हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानकावररील प्लॅटफॉर्म ५ वर उभी असलेली मालगाडी पाहून गेंदालाल मिल आणि शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी एका डब्याचे सील फोडून आज भरलेल्या अन्नधान्याचे पोते लुटून नेल्याचा प्रकार आज रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. परिसरातील नागरिक धाव घेऊन रेल्वेतील पोते घेऊन नेत असताना दिसून आले. यावेळी काही तरुणांनी दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वे गाडीचे येथून प्रस्थान झाले होते.

Exit mobile version