Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव रेल्वेस्थानकाजवळून तरूणाची दुचाकी लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या हॉटेलजवळून तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत अधिक वृत्त असे की, सौदागर बाबासाहेब खामकर (वय-३१) रा. रामनगर, मेहरूण, जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने गुरूवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजता जळगाव रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल शिल्पा येथे दुचाकी (एमएच १९ सीएन २७७१) ने आला होता. हॉटेलच्या बाहेर दुचाकी पार्क करून लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. काम आटोपून सौदागर खामकर दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी मिळून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनिवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे.

Exit mobile version