Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव शिवसेना महानगरतर्फे केंद्राचे नामकरण करून अनोखा निषेध (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी  । केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डीझेल दरवाढी विरोधात शिवसेना महानगर व महिला आघाडीतर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या बालिश निर्णयाचा पाळना गाऊन नामकरण आंदोलन महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

माजी महापौर तथा जेष्ठ नगरसेवक विष्णू भंगाळे,  यांनी आंदोलना मागील भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की,  केंद्र सरकार प्रत्येकवेळी पेट्रोल व डीझेलची दरवाढ करत आहे. जनतेच्या सहनशीलतेच अंत झाला आहे. कोविड नंतर दिलासा मिळेल अशी अशा वाटत होती. तसेच अर्थसंकल्पात देखील दिलासा मिळालेला नसल्याने  शिवसेना महिला आघाडीतर्फे केंद्र सरकारचे बारसे करून नाव ठेवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सरिता माळी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने पेट्रोल व डीझेलची दरवाढ करून बालिश निर्णय घेतला असल्याने आज कमळाबाईच्या मुलाचे बारसे करण्यात आले आहे. 

याप्रसंगी मनपा शिवसेना विरोधीपक्ष नेते सुनील महाजन,  नगरसेवक गणेश सोनवणे, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जकीर पठाण. महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी ज्योती शिवदे सरिता माळी मनीषा पाटील, शोभा चौधरी, मंगला बारी, निलू इंगळे सपना तिवारी, संगीता गवळी, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत, विजय बांदल, संजय कोल्हे अल्पसंख्यांक उप महानगराध्यक्ष वस्मिम खान, इकबाल शेख, विराज कावडीया आदी उपस्थित होते.     

 

भाग १

 

भाग २

Exit mobile version