Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव मनपाच्या दोन कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मनपाच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यासह एकाला मारहाण व शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरूणावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धीरज कांतीलाल सोनवणे (वय-२४) रा. आंबेडकर नगर आणि आकाश नथ्थू सोनवणे हे दोघे पालिकेचे गेल्या चार वर्षांपासून कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. दोघांकडे दररोज संजय गांधी परिसराची स्वच्छता करण्याचे काम नेमून दिले आहे. आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोघे संजय गांधी नगरात स्वच्छता करत असतांना विक्की अनिल गारूंगे रा. सिंगापूर कंजरवाडा हा येूवन धीरजला शिवीगाळ करून माझ्या मावशीच्या घरासमोरील गटार साफ का केली नाही ? असे बोलून मारहाण केली. यावेळी सोबत असलेल्या आकाश सोनवणे आवराआवर करण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोगय अधिक्षक एस.बी.बडगुजर, आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे, मुकर्दम राजेंद्र निळे यांना देखील शिवीगाळ केली. धिरज सोनवणे याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version