Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढतांना एकाचा मोबाईल लांबविला; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । बसमध्ये चढत असतांना एकाच्या खिश्यातून ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुरेश तारांचंद पाटील (वय-४९) रा. शिंदखेडा जि.धुळे हे कामाच्या निमित्ताने जळगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. काम आटोपून घरी जाण्यासाठी ते सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानकात आले. दरम्यान, जळगाव-अमळनेर बस सायंकाळी ७.४५ वाजता बसस्थानक प्लॅटफार्मवर आली. सुरेश पाटील हे बसमध्ये चढत असतांना शर्टाच्या खिश्यातून ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याचे बसमध्ये बसल्यावर रात्री ८ वाजता लक्षात आले. चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना कोणीच मिळून आले नाही. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. पुरूषोत्तम वागळे करीत आहे.

Exit mobile version