Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव – पुणे विमानसेवेला मंजुरी

 

 

जळगाव : प्रतिनिधी । जळगाव येथून आता इंदूर आणि पुण्यालाही लोकांना विमानाने जात आणि येत येणार आहे , या सेवेसाठी बोली निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत , अशी माहिती आज खासदार उन्मेष पाटील यांनी दिली

या संदर्भात तपशीलवार बोलताना खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की , जळगाव विमानतळाच्या उभारणीनंतर सर्वात आधी रात्रीच्या उड्डाणाची परवानगी मिळवली गेली . त्यानंतर जळगाव – मुंबई व जळगाव – अहमदाबाद अशी विमानसेवा सुरु करण्यात आली ही सेवा मध्यंतरी कोरोनामुळे खंडित झाली होती आता ती पूर्ववत होईल .आता या विमानतळावरील पायाभूत विकासाच्या कामांसाठी ५५ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत .

सर्वात महत्वाचे म्हणजे जळगावला केंद्र सरकारकडून वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले आहे राज्यातील हे एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र असेल असेही त्यांनी सांगितले .

Exit mobile version