जळगाव पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध

 

 

जळगाव, प्रतिनिधी । संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननीची  मुदत संल्यानंतर आज सर्व म्हणजे १४ संचालकांची निवड बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले

 

जळगाव पीपल्स को ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी  १४ जागांसाठी २७ सभासदांनी नामनिर्देशन पत्र घेतल्यावर २४ सभासदांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नामनिर्देशनपत्रांची छाननीमध्ये ९ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतल्याने १४ उमेदवारांचे अर्ज बाकी राहिल्याने सदर १४  उमेदवार बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज ऑनलाइन सभेमध्ये जाहीर केले.

 

 

दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांची २०२१-२०२६  या कालावधीकरिता निवडणूक प्रक्रिया सहकारी संस्था सांगली जिल्हा उपनिबंधक एन. डी. करे यांच्याकडून राबविण्यात आली

.

निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. कारे यांच्या अध्यक्षतेखाली आज सभासदांची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमाद्वारे घेण्यात आली. या सभेस ऑनलाईन पद्धतीने सुमारे ६०० पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती होती.  सुरुवातीस बँकेच्या बोर्ड सेक्रेटरी स्वाती सारडा यांनी बँकेच्या नियमानुसार कोरम पूर्ण असल्याने सभेस सुरुवात करण्यासाठी सभेचे सूत्र निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. करे यांच्याकडे सुपूर्द केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभेला सुरुवात करून निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केल्यापासून आजच्या सर्वसाधारण सभेपर्यंत झालेल्या प्रक्रियेच्या  इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर ही बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली

 

बँकेचे बिनविरोध नवनिर्वाचित संचालक मंडळ सदस्य  असे आहे  —   भालचंद्र पाटील, प्रकाश कोठारी, चंद्रकांत चौधरी, सुनील पाटील, रामेश्वर जाखेटे, प्रविण खडके,  ज्ञानेश्वर मोराणकर, अनिकेत पाटील, चंदन अत्तरदे, विलास बोरोले, सुहास महाजन, स्मिता पाटील, सुरेखा चौधरी, राजेश परमार .

 

Protected Content