Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव तालुक्यात १५ व १७ फेब्रुवारी रोजी सरपंच निवड

 

जळगाव, प्रतिनिधी। तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ४२  ग्रामपंचातीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून तहसीलदारानी प्रत्यक्ष सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सरंपच व उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम तहसीलदार नामदेव पाटील यांनी जाहीर केला आहे. यात १५  व १७ फेब्रुवारी या दोन दिवसी सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.  सरपंचपदाच्या निवडीसाठी स्थानिक गावपातळीवर अनेक ठिकाणी चुरस निर्माण झाली असल्याचे चित्र दिसुन येत आहे.  

जळगाव तालुक्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असा राहणार आहे यात सोमवार दि. १५ फेब्रुवारी रोजी शिरसोली प्र. बो., म्हसावद, आसोदा, आवार, कानळदा, कुसुंबा खुर्द, भादली बु., फुपनगरी, धानवड, भोकर, बोरनार, नांद्र बु, सावखेडा बु., मोहाडी, रायपुर, जळगाव खु., फुपणी, वडली, वावडदा, शेळगाव-कानसवाडे, मन्यारखेडा, रिधुर, गाढोदा, नांद्रा खु.- खापरखेडा  येथे सरपंच निवड करण्यात येणार आहे.   

बुधवार दिनांक १७ फेब्रुवारीला  रोजी शिरसोली प्र. न. ममुराबाद, तुरखेडा, वडनगरी, उमाळे-देव्हारी, आव्हाणे, कंडारी, कठोरा, लमांजन-वाकडी-कुऱ्हाडदे, पिलखेडा, दापोरा, धानोरा बु.- नागझीरी, चिंचोली, जवखेडे, रामदेववाडी, कडगाव, तरसोद, डिकसाई येथील  सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी तहसीलदार नामदेव पाटील यांनी  २५ अध्यासी प्राधीकृत अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

 

Exit mobile version