Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव तालुक्यातील तापीकाठी आढळला तरुणाचा मृतदेह

जळगाव प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह जळगाव तालुक्यातील तापी नदीच्या काठावर आढळुन आला. सोमवारी (२० जूलै) रात्री ७.३० वाजता हा मृतदेह आढळून आला.

मुकेश लक्ष्मण खराटे (वय ३०, रा.वराड, ता.चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मुकेश हा विवाहीत तरुण होता. दरम्यान, सोमवारी रात्री ७.३० वाजता जळगाव तालुक्यातील भोकर गावालगत तापी नदीच्या काठावर तो मृत अवस्थेत आढळून आला. पोलिस पाटील हेमलता पवार यांनी तालुका पोलिसांनी ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ, मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. मंगळवारी तरुणाची ओळख पटल्यानंतर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. मृत मुकेश याच्या शरिरावर मारहाण केल्याचे व्रण नसल्यामुळे त्याच्यासोबत घातपात झाल्याची संशय नसल्याचे पोलिसांनी सांगीतले. मुकेश भोकर गावी का व कसा आला? याची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान मृत्यूचे कारण कळण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे. दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक कदीर तडवी तपास करीत आहेत.

Exit mobile version