Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग केला आणि महिलेसह तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या संदर्भात शनिवारी २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिलाही आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. २७ एप्रिल रोजी रात्री १० वाजता महिलाही घरी एकटी असताना गावात राहणारा गणेश रघुनाथ सोनवणे हा महिलेच्या घरात घुसून तिच्याशी अंगलट केले त्यानंतर अश्लील कृत्य करत महिलेचा विनयभंग केला. तसेच “तुझा पती खूप माजला आहे, ही घटना जर कोणाला सांगितली तर तुला व तुझ्या पतीला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने शनिवारी २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश रघुनाथ सोनवणे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहे.

Exit mobile version