Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव तहसील कार्यालय समोरून एकाची दुचाकी लांबवली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील तहसील कार्यासमोरून एकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून इल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संजीव प्रल्हाद कलाल (वय 58) रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते साडेआठ वाजे दरम्यान कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ सीबी १२७८) याने जळगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर आले होते. त्यावेळी त्यांनी तेथील अपार्टमेंटच्या बाजूला दुचाकी पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता त्यांना दुचाकी कुठेही मिळून आली नाही.

अखेर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करत आहे.

Exit mobile version