Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव तहसील आवारातून एकाचा मोबाईल लांबविला; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तहसील कार्यालय परिसरातून तरूणाचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, किरण नारायणराव देशमुख (वय-३२) रा. शिवधाम मंदीराजवळ जळगाव हा तरूण शिक्षण घेत आहे. कामाच्या निमित्ताने बळीराम पेठेतील जळगाव तहसील कार्यालयात १ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आला होता. दरम्यान, त्यावेळी त्यांच्या खिश्यातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. थोड्यावेळा आपल्या खिश्यातील मोबाईल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोधाशोध केली परंतू मोबाईल आढळून आला नाही.

 

याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.

Exit mobile version