Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात समतोल प्रकल्प राबविणाऱ्या सपना श्रीवास्तव यांचा गौरव

जळगाव प्रतिनिधी । गेल्या ५ वर्षापासून भुसावळ व जळगाव रेल्वे स्टेशन येथे केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून पळून आलेल्या, भरकटलेल्या, व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांना आधार देऊन त्यांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे उल्लेखनिय कार्य करत असल्याबद्दल समतोल प्रकल्पाच्या व्यवस्थापिका सपना श्रीवास्तव यांचा राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त  निसर्ग मित्र समिती धुळे जिल्हा ही दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करीत असते. निसर्ग मित्र समिती, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, धुळे  व श्री दत्तप्रभू अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. शिरपुर यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधत राज्यस्तरीय महिला परिषद येथे घेण्यात आली होती. पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले.

निसर्गमित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय भामरे, उद्योजक दिपक पाटील यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पाडला. समतोल प्रकल्पाच्या माध्यामतून आजपर्यन 2012 मुलांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. असून त्यामध्ये २५ राज्यासंह 275 ठिकाणी समतोल चे कार्यकर्ते प्रत्यक्ष जाऊन पोहचले आहेत.  याचाच परिणाम म्हणून जळगाव व भुसावळ रेल्वे स्टेशन येथे नशा करणाऱ्या मुलांचे प्रमाण राहिले नाही. सपना श्रीवास्तव यांना पुरस्काराचे श्रेय हे समतोल टिमला दिले आहे.

Exit mobile version