Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात मद्यविक्री 17 मे पर्यंत बंदच ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनची मुदत दोन आठवडे वाढवितानाच ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिल्याचे वृत्त होते. मात्र जळगाव जिल्ह्यात 17 मे पर्यंत मद्यविक्री बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत.

 

 

जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी आज आदेश काढून याविषयी स्पष्ट केले आहे. याआधी तीन मेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार असल्याचे आदेश होते/ मात्र आता मद्य विक्रीचे दुकाने 17 मे पर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहेत. गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, ग्रीन व ऑरेंज झोनमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज क्षेत्रांमध्ये सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले आहे. परंतू यासाठी काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ग्रीन, ऑरेंज व रेड या तिन्ही झोनमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. परंतू दारूची दुकाने सुरू करायची का नाहीत हा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात आला होता. कारण या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरच्या नेमक्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन आहे.

Exit mobile version