Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात आज नवीन 40 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज नवीन 40 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1851 इतकी झाली आहे.

 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३, भुसावळ ८, अमळनेर ६, चोपडा ०, पाचोरा २, भडगाव २, धरणगाव ३, यावल १, एरंडोल ०, जामनेर १, जळगाव ग्रामीण १, रावेर ७, पारोळा ६, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड ०, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८५१ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्यातील भुसावळ तालुका आणि अमळनेर तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. आज आलेल्या रिपोर्टनंतर जिल्ह्यात आजवरील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही १८५७ इतकी झालेली आहे. यामध्ये सर्वाधीक रूग्ण संख्या जळगाव तालुक्यात (शहर ३२७ + ग्रामीण ५७) ३८४ इतकी आहे. याच्या खालोखाल भुसावळ तालुक्यातील रूग्णांची संख्या ३२७ इतकी झालेली आहे. यानंतर अमळनेर-२३६ ; चोपडा-१४१; रावेर-१४०; भडगाव-९५; यावल-९८; धरणगाव-९१; जामनेर-८६; पाचोरा-४५; एरंडोल-५६; पारोळा-९९; चाळीसगाव-१८; मुक्ताईनगर-१५ व बोदवड- १४; व इतर जिल्ह्यातील ६ रूग्णांचा समावेश आहे.

Exit mobile version