Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यातील आधार केंद्र शनिवार व रविवारी देखील सुरू ठेवा – मनसेची मागणी

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सुटीच्या दिवशी देखील केंद्र सुरु ठेवावेत अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की ,आधार केंद्रच्या वेबसाईटवर शनिवार व रविवार व सुटीच्या दिवशी केंद्र सुरु राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र आधार केंद्र बंद राहत असल्याने नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आठवड्यात पाच दिवस आधार केंद्र सुरू असतात. नविन आधार बनविणे, आधार नंबर मोबाईलला लिंक करणे, मोबाईल नंबर बदलविणे, पत्ता बदलविणे, फोटो बदलविणे, बँक खात्याला आधार जोडणे आदी अनेक कामाकरीता आधार अनिवार्य करण्यात आले आहे. आधार केंद्राच्या वेबसाईटवर आधार केंद्र हे आठवड्याच्या सातही दिवस सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सुरू असतात अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील आधार केंद्र शनिवार व रविवार बंद असतात. बहुतेक आस्थापनांना फक्त शनिवार, रविवारी सुटी असते त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना फक्त शनिवार / रविवारीच आधार अपडेट करण्याकरीता वेळ मिळत असतो व तसे होत नसल्याने त्यांना त्यांचा रोजगार बुडवून आधार अपडेट करावा लागतो. आधार केंद्राचे संचलन ऑनलाईन असते त्याकरीता जिल्ह्यातील आधार केंद्र आठवड्याच्या सातही सुरू ठेवण्यात यावे, ही विनंती. कळावे.

Exit mobile version