Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या सचिवपदी अनिल बडगुजर

 

यावल, प्रतिनिधी । काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी सौखेडासिम ता. यावल येथिल काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते अनिल राजाराम बडगुजर यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड प्रदेशाध्यक्ष अॅड . सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी नियुक्ती पत्राद्धारे केली आहे

अनिल बडगुजर यांची काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवडीबाबत त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तसेच श्री. बडगुजर यांचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब अजबराव पाटील, काँग्रेस सेवा फौंडेशनचे कपिलजी सूर्यवंशी, शुभम शिंदे, संदीप माळी,प्रदीप डाकरे, गौरव चौहान,जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब आर.जी. पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, काँग्रेसचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद रवान, समाजसेवक युनूस पिंजारी, खलिलशाह कादरशाह , पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन व्यंकट चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, चंद्रकला इंगळे, रामराव मोरे, शामभाऊ पाटील, ग्रामीण कौग्रेस सेवा फाउंडेशनेचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, विक्की पाटील,विवेक सोनार, अनिल जंजाळे, नईमभाई, हर्षल दाणी, रेहमान भाई ,सह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version