Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव एमआयडीसीत ट्रक चालकाचा आकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक चालकाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास क्लिनर याच्या लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामदास देविदास बैरागी (वय 55) रा.वरणगाव ता. भुसावळ हे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन जळगाव याठिकाणी गॅस हंडी ट्रकवर चालक म्हणून कामाला आहेत, रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी ट्रक पार्किंगला लावल्यानंतर पेट्रोल पंपा समोरील नाना यांच्या ढाबा समोर झोपले. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ट्रकवरील सहाय्यक रमेश सोनार हा उठवण्यासाठी गेला असता रामदास बैरागी हे मयत स्थितीत आढळून आले.

ट्रकवरील क्लिनर ने नशिराबाद येथे राहणाऱ्या ट्रक मालक नरेंद्रसिंग शीतलसिंग यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार नरेंद्र सिंग शितल सिंग यांच्या खबरी वरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास रतिलाल पवार हे करीत आहे.

Exit mobile version