Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात ३४ किलो गांज्यासह एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस व एलसीबीच्या पथकाने संयुक्तपणे ३४ किलो गांजाची वाहतूक करणार्‍या आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून १ लाख ७० हजाराचा गांजा व ५ लाख किमतीची कार हस्तगत करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एक इसम स्विप्फ्ट डिझायरने गांजा वाहतुक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषगाने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबाराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्‍नी नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील स्टॉफ व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ.शरद भालेराव, रामकुष्ण पाटील, जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, महेश पाटील, दत्तात्रय बडगुजर, दिपक चौधरी, दर्शन ढाकणे, भुषण सोनार यांचे पथक तयार करण्यात आले.

दरम्यान, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात हॉटेल सुमेरसिंग समोर सार्वजनिक जागी शेख युसुफ शेख मुसा (वय -४०) रा.बिलाल मजिद जवळ , तांबापुरा, जळगाव हा पांढर्‍या रंगाच्या स्विप्फ्ट डिझायर क्रमांक (एमएच १२ के एन ५१६९) या कारमध्ये १ लाख ६९ हजार २९० रुपये किमतीचा ३३.८० किलो वजनाचा गांजा घेऊन जातांना आढळला. यामुळे गांज्यासह त्याची पाच लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्या विरूध्द विरुध्द पोहेकॉ शरद भालेराव यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version