Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी ‘सीटू’तर्फे निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अशास्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)च्या वतीने महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. सीटूतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी निदर्शने करण्यात आले. शहरातील सीटूतर्फे काँम्रेड विजय पवार यांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

अश्या आहे विविध मागण्या
१. जून महिन्यात शासनाने घोषणा केले की अशास्वयंसेविका यांच्या मानधनातील वाढ २ हजार व गटप्रवर्तकच्या मानधनात ३ हजार रूपयांची वाढ केली. त्याची अंमलबजावणी करून नोव्हेंबर २०१९ पासूनचा फरक अदा करावा.
२. अशास्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योजना कर्मचारीचा दर्जा द्यावा व त्यांना सेवेत काय करून किमान वेतन द्यावे.
३. अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना (ग्रामीण व शहरी) यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कोरोना विशेष सेवा पुरस्कार बजावत असल्याबद्दल ३०० रूपये रोज प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा.
४. कोरोना सेवा बजावत असलेल्या अशास्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मास्क, मोबाईलभत्ता, सॅनिटायझर, पी.पी.ई किट आदी सुविधा देण्यात याव्यात.
५.कोवीड सर्वेक्षणात अशास्वयंसेविका व गटप्रवर्तकांवर हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

 

Exit mobile version