Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात श्रीकृष्ण लॉनसमोर कारची दुचाकीला जोरदार धडक; एमआयडीसीत गुन्हा

 

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील श्रीकृष्ण लॉनजवळ भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीधारक गंभीर जखमी झाल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय भागवत महाजन (वय-२५) रा. वंजारी खपाट ता. धरणगाव हा तरूण दुचाकी (एमएच १९ एन ७४५०) ने पाचोरा येथे मावशीला भेटण्यासाठी १६ मार्च रोजी गेला होता. मावशीला भेटल्यानंतर दुचाकीने वंजारी खपाट येथे दुचाकीने मावसभावासोबत जळगावमार्गे जाण्यास निघाला. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील श्रीकृष्ण लॉन समोरून दुचाकीने जात असतांना मागुन भरधाव वेगाने जाणारी (एमएच १९ सीयू ०२६६) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार विजय महाजन आणि मावसभाऊ (पुर्ण नाव माहित नाही) हे गंभीर जखमी झाले. तर घटनास्थळाहून कारचालक फरार झाला. याप्रकरणी विजय महाजन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अलताफ पठाण करीत आहे.

Exit mobile version