Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात शासकीय दरात डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (व्हिडिओ)

 

जळगाव, संदीप होले । जळगाव पीपल्स बँक, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचलित  प्रभाकर पाटील हॉस्पिटल तर्फे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ शासकीय दरात रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी डॉ. तेजस राणे उपस्थित होते.  

जळगाव पीपल्स बँक, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट  जळगाव पीपल्स बँक संचालित, प्रभाकर पाटील हॉस्पिटलतर्फे मानवीय दृष्टिकोनातून पूर्णत्व शासकीय  दरात “डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर “रुग्णसेवेसाठी अर्थात कोरोना युद्धात ,कोरोनाला हरविण्यासाठी सुसज्ज आहे. हे सेंटर यशवंतराव पाटील मुक्तांगण, सरस्वती नगर, जुना नेरी नाका, जळगाव याठिकाणी सुरु करण्यात आलेले हे.  रुग्णसेवेसाठी याठिकाणी अनुभवी डॉक्टर्स , कुशल तज्ञ, प्रशिक्षित  नर्सिंग स्टाफ, काळजीवाहू वेड अटेण्डन्स अशी मोठी टीम २४  तास सेवेसाठी तत्पर आहेत. गंभीर रुग्णांसाठी सुसज्ज  कोविड अतिदक्षता विभाग, सेमी आयसीयु,  जनरल वार्ड आहे. येथील वैद्यकीय खर्चाच्या बाबतीतही विशेष म्हणजे ठरलेल्या शासकीय दरात  सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या अनुषंगाने प्रभाकर पाटील हॉस्पिटलचे हे डेडिकेटेड कोविड सेंटर हा कोरोना रुग्णांसाठी  महत्वपूर्ण पर्याय आहे. या पर्यायाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भाल चंद्र पाटील यांनी आहे.

 

Exit mobile version