Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात शांतीदूत कबुतरे आकाशात सोडून पैगाम – ए – अमनचा संदेश (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय संस्कृती व संविधानाला अनुसरून हवा असलेला समाज निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता, शांती व बंधुभाव अबाधित राहून समाजात एकोपा कायम असावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत सै. नियाज अली भैय्या फौंडेशनने पुढाकार घेवून पैगाम – ए – अमन ( शांतीचा संदेश) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

पैगाम – ए – अमन ( शांतीचा संदेश) कार्यक्रमाचे उद्घाटन शांतीचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या शुभ्र कबूतर सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते आकाशात सोडून करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सै. अयाज अली नियाज अली यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भवानी मंदिरचे धर्मगुरू पंडित महेश कुमार त्रीपाठी, सुन्नी जामा मस्जिदचे मौलाना जाबीर रजा अमजदी, गुरुद्वारा गुरु सिंग सभाचे ग्यानी गुरुप्रीत सिंग, सेंट अलायन्स चर्चचे फादर सुमसिंग आर्य, बौद्ध धर्मगुरू पूज्य भन्ते संघनायक यन सुगंत वंत जी महाथेरो, सै. अयाज अली नियाज अली, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे दीपक जोशी, मौलाना नौशाद साबरी, अस्सलाम बाबा अशरफी यांनी आप आपल्या धर्मग्रंथात मानवता, शांती, बंधुभाव व देशभक्ती याविषयी काय लिहिलेले आहे ? यावर प्रकाश टाकत उपस्थित नागरिकांना महत्वपूर्ण, मोलाचे मार्गदर्शन करून एक आदर्श देशभक्त, एक आदर्श धर्म अनुयायी, एक आदर्श मानव म्हणून काय करायला हवे तसेच काय करू नये याविषयी सांगितले.
धर्मग्रंथातील श्लोक म्हणत त्याचे अनुवाद करून लोकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम हा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा झालेला असून आजपासून तर २६ जानेवारीपर्यंत सतत सुरू राहणार आहे. याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, डॉ. परिमल मुझुमदार, नारायण वाणी, योगेश मराठे, मनोज कपश्प, सुरज गुप्ता, मुकेश परदेशी, शेख शफी, हाजी सलीम उद्दीन, बन्सी सामंथा, नंदकुमार वाणी, नितीन शिंपी, शेख नजीर उद्दीन, जावेद बागवान यांसह नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version