Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू

 

जळगाव प्रतिनिधी । शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर घरात जात असतांना सुरू असलेल्या कुलरला धक्का लागल्याने ३२ वर्षीय अपंग विवाहितेचा मृत्यू झाला. कुलरमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने ही दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे हनुमान नगर परिसरात शोक व्यक्त होत आहे.

रामानंद नगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता ज्ञानेश्वर कुमावत (वय-३२) रा. हनुमान नगर, वाघ नगर परीसर ह्या रात्री १० वाजेच्या सुमारास शौचालयातून बाहेर निघाल्यानंतर विद्यूत प्रवाह उतरलेल्या पत्र्याच्या कुलरला धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व छातीजवळ विजेचा धक्का लागल्याने ही घटना घडली. सदर विवाहितेस रेणूका (वय-१२) व मुलगा राज (वय-४), आई व दोन भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version