Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील श्याम नगर परिसरातून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलीसांनी कारवाई केली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील श्यामनगर ते हरीविठ्ठल नगरात अवैधरित्या वाळूची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे होत असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्याम नगर परिसरात कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. ट्रॅक्टर चालक समाधान खंडू सोनवणे रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव याच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही त्यामुळे पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ट्रॅक्टर चालक समाधान खंडू सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Exit mobile version