Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात वाळू डंपरच्या धडकेने एक जण जखमी

 

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील समर्थनगर लाठी शाळेजवळ ३५ वर्षीय गृहस्थाला वाळू डंपरने धडक दिल्याची घटना आज (दि.२७) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघात होताच चालकाने जागीच वाहन सोडून पळ काढला असून जखमी तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

अपघाताला कारणीभुत असलेले डंपर रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाळू उत्खनन व वाहतूकीला बंदी असतांना वाळूमाफियांकडून वाळूची सर्रास वाहतुक होत असल्याचे या डंपरमुळे सिद्ध झाले आहे. शहरातील पिंप्राळा येथील रहिवासी तसेच पेंटर काम करणारे शेख अकिल शेख रशिद (वय-२५) सकाळी कामासाठी घरुन निघाले होते. समर्थनगर लाठी शाळेजवळून पायी जात असतांना मागून सुसाट वेगात आलेल्या डंपने त्यांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकिल यांचा पाय फ्रॅक्‍चर झाला असून इतरत्र मुकामारही लागलेला आहे. जखमीला परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना कळवल्यावर बराच वेळ पोलिस पोहचू शकले नाहीत. परिणामी अपघाताला कारणीभुत डंपरवरील चालकाने पळ काढला. पोलिसांनी वाळूचा डंपर जप्त केला असून जखमीचा जबाब नोंदवल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version