Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सोळा दुकानदारांवर गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतर व आधीच दुकान, खानावळ व मटन हॉटेल उघडे ठेवणाऱ्या सोळा जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात शिथिलत ठेवत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी वेळेचे नियोजन करून दुकानदारांना उघडण्याची मुभा दिली आहे. दिलेला वेळ संपूनही दुकान, मटन हॉटेल, खानावळ सुरू ठेवणाऱ्या सोळा जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे. यात १) सुतीम ज्ञानेश्वर पाटील तांदलवाडी यांचे भुसावळ रोडवरील केकबाईट नावाची बेकरी, २) रंजीत स्वरुपचंद जैन रा, हनुमान नगर, मेहरुण जळगाव यांचे आनंद किराणा दुकान जोशी कॉलनी, ३) मनोज विजय गावीत रा. साक्रि धुळे यांचे गोदावरी कॉलेज समोरील नुपूर हॉटेल, ४) गिरीश प्रकाश धनगर रा. आठवडे बाजार, कासमवाडी यांचे नारखेडे मटन हॉटेल, ५) राजकुमार नारायण पाटील रा, मेस्को माता नगर कोळी पेठ यांचे नारखेडे मटन हॉटेल, ६) मतीन अहमद पटेल रा. सुप्रीम कॉलनी यांचे किराणा दुकान, ७) देविदास तुकाराम पाटील रा. सुप्रीम कॉलनी यांचे किराणा दुकान, ८) अनीस खान सुलतान खान रा. सुप्रीम कॉलनी यांचे किराणा दुकान, ९) बजीर गुरुमुख राठोड रा. सुप्रीम कॉलनी यांचे किराणा दुकान, १०) देवराम लाला भंगाळे रा. मेहरुण जळगाव यांचे किराणा दुकान, ११) नामदेव वसंत वंजारी रा. मेहरुण जळगाव यांचे किराणा दुकान, १२) नितीन सुकदेव सोनवणे रा. रामेश्‍वर कॉलनी जळगाव यांचे किराणा दुकान, १३) आशीष लखीमचंद सीगवीरा अयोध्या नगर यांचे किराणा दुकान, १४) फरीदा बानो मोहम्मद रईस रामेहरुण जळगांव यांचे मननत किराणा दुकान, १५) सुनील राधामोरे रा रामेश्वर कॉलनीयांचे किराणा दुकान, १६) अकिल कययमखाटीकरा मेहरुण जळगाव यांचे मच्छिशॉपचे दुकान यांच्यावर भादवी कलम १८८, २६९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोउनि विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दादासाहेब वाघ, सचिन पाटील, योगेश बारी, माजी सैनिक रवींद्र बाविस्कर यांनी ही कारवाई केली.

Exit mobile version