Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात ‘सकल लेवा पाटीदार बिझिनेस एक्स्पो’चे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व अग्रिकल्चर आणि  लेवा पाटीदार ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ‘सकल लेवा पाटीदार बिझिनेस एक्स्पो-२०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.

 

लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व अग्रिकल्चर  म्हणजेच एलसीसीआयए ही लेवा  समाजातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी स्थापन झालेली औद्योगिक, व्यावसायिक, कृषी संस्था आहे.मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. रवींद्र धनंजय चौधरी हे. संस्थापक व विद्यमान अध्यक्ष तर, डॉ पवन सुरेश भोळे सचिव आहेत. कृषी विभाग अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पिंपळे पुणे, हे आहेत. समविचारी उद्योजकांनी एकत्र येवून समाजासाठी ही संस्था स्थापन केली आहे.

 

लेवा पाटीदार समाजातील,उद्योजक ,व्यावसायिक,समाज बांधव यांचा एकमेकांशी औद्योगिक, व व्यावसायिक परिचय व्हावा,एकमेकांना मदत व सहकार्य मिळावे,त्यातून प्रत्येकाच्या व्यवसायाची वाढ, भरभराट व्हावी,नवीन उद्योजक तयार व्हावेत,त्यांना वेळोवेळी ज्येष्ठ उद्योजक यांचं मार्गदर्शन ,सहकार्य,मदत,मिळावी हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

 

दरम्यान, जळगावात संस्थेतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  ३० सप्टेबर ते २ ऑक्टो २०२२,शुक्रवार,शनिवार,रविवार रोजी कै. बॅरिस्टर निकम चौक ,सागर पार्क जळगाव या ठिकाणी लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो आयोजीत करण्यात आले आहे.

 

 

जळगाव शाखेचे अध्यक्ष  नितीन वसंत इंगळे. किशोर ढाके,सचिव  बिपिन दिनकर पाटील, चंदन वसंत कोल्हे, भूषण बढे, महेश चौधरी व त्यांचे सर्व सहकारी ,लेवा सखी घे भरारी चे Aर्वीं. सौ भारती ढाके, सौ स्मिता पाटील,डॉ,सौ नीलम किनगे व त्यांचे सर्व सहकारी  लेवा सम्राज्ञी फाऊंडेशन चे सौ. डॉ ज्योती महाजन ,सौ. नीला चौधरी,सौ. नीता वराडे ,डॉ सौ. सुनीता चौधरी हे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

 

या बिझनेस एक्सपोमध्ये  ऑटोमोबाइल्स, ट्रॅक्टर,उत्पादक,सोलर,बचतगट, पेंटस, कृषी,होम डेकोर,फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, एफएमसीजी, फूड, बिल्डर्स,कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर यांचा सहभाग असणार आहे. यात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी अरूण बोरोले यांच्याशी  ९४२२२९२८३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच बिझनेस एक्सपोमध्ये स्टॉल बुकिंग साठी ८८८८८७६१११. ९३७२०९७०००. ९८२२०६३३१८. ९८२३४०९९९९.यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version