Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीचा कॉंग्रसतर्फे रॅलीद्वारे निषेध (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची चौकशी केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत निषेध रॅली काढून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

 

कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ही निषेध रॅली जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी, जि . प. गटनेते प्रभाकर सोनवणे, उदयसिंग पाटील, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, मुजीब पटेल, रमेश शिंपी, अनिल निकम, रवींद्र जाधव आदींनी रॅलीत सहभाग नोंदविला.

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी ईडीने समन्स बजावून राहुल गांधी यांची दि. १३ जून रोजी चौकशी केली होती. दोन दिवस चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात आले. ‘ याविरोधात काँग्रेस कायकर्ते रस्त्यावर उतरले होते.

 

 

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

Exit mobile version