Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात रक्तदानासह आरोग्य तपासणी शिबिर (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । सेंटर रेल्वे मजदूर संघ जळगाव-पाचोरा शाखा, मुक्ती फाउंडेशन व उपहार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०० हून अधिक रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व इतर नागरिकांनी  रक्तदान देखील केले. 

 

या शिबिराचे आयोजन जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील सेंटर रेल्वे मजदूर संघाच्या कार्यालयात करण्यात आले होते. शिबिराप्रसंगी मंडळ सचिव एस.बी. पाटील , सीआरएमसचे सचिव गणेशकुमार सिंग, विश्‍वास पाटील, रितेश श्रीवास्तव, एस.पी.जोशी, वाल्मिक बोरसे, डी.के.रवी उपस्थित होते. यावेळी  मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकूंद गोसावी, उपहार गृहाचे पवन जैन, जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्राचे बाळासाहेब कुमावत, विनय सिन्हा , मनीष शर्मा, हेमराज मीना, गणेश पाटील, अविनाश कुमार, पियुष माहेश्वरी,श्री. बडगुजर , सुषमा बऱ्हाटे, योगेश चव्हाण, निलेश बोरणारे, चंदू आण्णा सपकाळे, गजानन पाटील,  संदीप चौधरी, पंकज अडकमोल,शेख फारुख, प्रदीप पाटील आदींची उपस्थिती होती.  मुकूंद गोसावी तसेच गणेशकुमार सिंग यांनी केलेल्या रक्तदानाने शिबिराचा प्रारंभ झाला.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन होते. व्यस्त असल्याने ते येवू शकले नाही. त्यांन दुरध्वनीवरुन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. शिबिरात १०० हून रेल्वे कर्मचारी, अधिकार्‍यांनी रक्तदान केले.दरम्यान, गणेश सिंह  यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून  थालासिमियाग्रस्त पीडित मुलास १००१ नकदी स्वरुपात देण्यात आले.  रक्तदान शिबिरास  शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ. उमेश कोल्हे व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. शिबिरात ब्लडप्रेशर, मधुमेह, हृदरोग याप्रमाणे आरोग्य तपासणीही करण्यात आली. डॉ. अतुल भामरे व डॉ. योगेंद्र नेहते यांनी ही तपासणी केली. रेल्वे कर्मचारी, प्रवाशांसह अनेकांनी दिवसभरात तपासणी केली.

 

 

 

Exit mobile version