Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात युवकांसाठी उद्योग , व्यवसाय करिअर  मार्गदर्शनाचे आयोजन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तेजोदीप नवविचार फाउंडेशन नाशिकतर्फे ९ एप्रिल रोजी उद्योग , व्यवसाय , करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

समाजातील सुशिक्षित युवकांना उद्योग , व्यवसाय व शेती विषयक मार्गदर्शन मिळावे तसेच करिअर व रोजगार संदर्भात मदत व्हावी या उदात्त हेतूने तेजोदीप नवविचार फाउंडेशन , नाशिकने हा उपक्रम राबविला आहे. शनिवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजे दरम्यान रोटरी भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधवाना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  कार्यक्रमात व्यवसाय सूचीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम , महापौर जयश्री महाजन , सहाय्यक विक्रीकर आयुक्त सूर्यकांत कुमावत , रेड स्वस्तिक सोसा सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे , रवींद्र लढ्ढा,   संजय पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महिला स्वयंरोजगार – स्वाती शहा ,  शेती पूरक व्यवसाय – सागर धनाड ,  कौशल्य विकास – रागिब अहमद , स्पर्धा परीक्षा – प्रवीण नायसे हे मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा जास्तीजास्त लाभ घेण्याचे आवाहन तेजोदीप नवविचार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश नेहते , उपाध्यक्ष उज्वल चौधरी ,सरचिटणीस वसंत कोलते , हेमंत भंगाळे, संदीप राणे , जयंत राणे , योगेश कोलते , अतुल खडसे , नीता वराडे, ज्ञानदेव पाचपांडे, सुवर्णा वारके यांनी केले आहे.

Exit mobile version