Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात मेडीकल स्टोअर्स फोडले; ४५ हजारांची रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेडीकल स्टोअर्स फोडून गल्ल्यातील ४५ हजार रूपये रोख आणि ५०० रूपये किंमतीचा सामान चोरी केल्याचा प्रकार शिरसोली नाका परिसरात आज सकाळी १०वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रावण नामदेव भोई (वय-३६) रा. शिरसोली नाका, परख संकुल अपार्टमेंट जळगाव हे आपल्या पत्नी व मुलगीसह राहतात. त्याचे शहरात पारख संकुल अपार्टमेंट शॉप नं. १४ मध्ये भोईराज मेडीकल स्टोअर व जनरल स्टोअरचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे शटरच्या पट्ट्या तोडून आत प्रवेश करत दुकानात ठेवलेले ४५ हजार रूपये रोख आणि घरगुती वस्त असा एकुण ४५ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. आज सकाळी १० वाजता दुकानावर काम करणारा अरमान उसमान पटेल हा घरी येवून दुकानाच्या चाव्या घेवून दुकान उघडण्यासाठी गेला असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version