Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात महाराष्ट्र समविचारी मंचचे विविध मागण्यांसाठी आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या काळात कोवीड केअर सेंटरमध्ये काम केलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज १४ डिसेंबर रोजी ११ वाजता आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाच्या काळात सर्व आरोग्‍य विभागात शासकीय व निमशासकीय वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उणीव दिसून आली आहे व अजूनही अनेक पदे रिक्त आहेत. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात निव्वळ कोरोना मुकाबला करण्यासाठी राज्यभरात परिचारीका, वार्डबॉय, सफाई कामगार यांच्यासह अन्य तांत्रिक कर्मचारी भरती हंगामी स्वरूपात करण्यात आली. माऋ आता गरज संपल्यावर या कर्मचाऱ्यांना माकावरून काढण्यात आले . ही बाब माणसीला धरून नाही. महामारीच्या काळात कोरोनाच्या भितीने कर्मचारी मिळन नव्हते या स्थितीत सेवाभव माणुसकी याचा विचार करून या सर्वंना साथ दिलेली आहे. ही बाब दुर्लक्षुण चालणारी नाही. शिवाय यांना कायम सेवा न दिल्यास शासनाचा कृतघ्नपणा दिसून येईल.

यासर्वांचा विचार करून कोरोनाकाळात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे. केली आहे. या निवेदनावर डॉ. विद्या कांबळे, राहुल चौधरी, अशोक गायकवाड, डॉ. आरिफ शेख, सुनिता देवरे, माधुरी मोरे, चित्रा बडगुजर, कोमल मोरे, कांचन पाटील, सोनम केदार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Exit mobile version