Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बेवारस गोंडस बाळ आढळल्याने खळबळ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अमन पार्क परिसरात रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या रिक्षात चार दिवसाचे बेवारस बाळ आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील अमन पार्क परिसरात रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या हरुण गयासोद्दीन शेख (रा.मिर्झा चौक, शिवाजीनगर) यांच्या रिक्षेत चार दिवसाचे गोंडस बाळ बेवारसस्थितीत आढळून आले. रिक्षाचालक हे आपल्या मोठ्या भावाकडे अमन पार्क जवळ रिक्षा लावून गेले होते. अर्ध्या तासांत भावाला भेटून आल्यानंतर सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास रिक्षा जवळ आले असता रिक्षाच्या मागच्या सीटवर हे बाळ रडताना आढळून आले. त्यांनी पालकांचा शोध घेतला असता कोणीही आढळून आले नाही. त्याला पाहुन शेख चक्रावले होते. त्यांनी आजुबाजुच्या लोकांना बोलावून हा प्रकार सांगितला. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. यानंतर कादरीया फाऊंडेशनचे फारुख कादरी यांच्या मदतीने सुरूवातीला या बाळास शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर तेथुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Exit mobile version