Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बेकायदेशीर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ईश्वर कॉलनी परीसरात बेकायदेशीर हातात लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील लोखंडी सुरा हस्तगत केलाय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात एक तरूण हातात लोखंडी सुरा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. त्यानुसार स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.कॉ. असीम तडवी, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. नरेंद्र सोनवणे, पो.कॉ योगश बारी, पो.कॉ. सचिन पाटील यांनी ईश्वर कॉलनीतील लाठी शाळेच्या पाठीमागे जावून चौकशी केली असता संशयित आरोपी गोविंद शातीलाल झांबरे (वय-२०) रा.नाथवाडा जळगाव याच्याकडे बेकायदेशील १४ इंच लांबीचा लोखंडी सुरा मिळून आला. पो.कॉ. असिम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोविंद झांबरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version