Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे पथ संचलन

जळगाव प्रतिनिधी । आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस रूटमार्च घेण्यात आले. शहरातील संवेदनशील असलेल्या भागातून पोलीसांनी शक्ती प्रदर्शन केले.

जळगावातील तांबापूरा, शेराचौक, मेहरूण, सिंधी कॉलनी, शनी पेठ, काट्या फाईल, इस्मालपुरा, जुने जळगाव, कोळी वाडा, जैनाबाद, समता नगर या भागात पथ संचलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ निलाभ रोहन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम, शनी पेठ पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

https://www.facebook.com/watch/?v=608009329904993

Exit mobile version