Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांचा लाक्षणिक संप

Bank karmchari news

जळगाव प्रतिनिधी । देशातील सर्व सरकारी बँका आज आणि उद्या (शुक्रवार 31 जानेवारी आणि शनिवार 1 फेब्रुवारी) संपावर आहेत. रविवारच्या सुट्टीला जोडून पुकारलेल्या संपामुळे एकूण तीन दिवस बँकांचं कामकाज बंद राहणार असून जळगावात या बंदला बँकेतील कर्मचारी व अधिकारी संघटनांचा संप यशस्वी झाले असल्याचे दिसून आले. दरम्यान शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीनही दिवस बँक बंद राहणार असून नियमितप्रमाणे सोमवारी बँकेचे व्यवहार सुरळीत होणार आहे.

बँक कर्मचारी संघटनांची मध्यवर्ती संघटना असलेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ आणि ‘इंडियन बँक असोसिएशन’ यांच्या वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर गुरुवारी कोणतीही सहमती न झाल्यामुळे संपाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. यात विविध मागण्या करण्यात आले. यामध्ये 20 टक्के पगार वाढ, 5 दिवसांचा बँक आठवडा, नवीन पेन्शन योजना काढून जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्ती तसेच फॅमिली पेन्शन मध्ये सुधारणा व वाढ करणे, सर्व बँके शाखांसाठी कार्यालयीन कामकाज वेळ व भोजन आवकाश वेळ सुनिश्चितीकरण करणे आणि बँक अधिकारी वर्गासाठी कामाकाजाच्या वेळा निश्चित करणे यासह आदी मागण्यांसाठी देशभरात दोन दिवसीय हा संप पुकारण्यात आला होता. दरम्यान शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीनही दिवस बँक बंद राहणार असून नियमितप्रमाणे सोमवारी बँकेचे व्यवहार सुरळीत होणार आहे.

Exit mobile version