Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात पोलिसाला मारहाण; तरूण अटकेत

जळगाव प्रतिनिधी । टवाळखोरपणा करणार्‍या तरूणाला अटकाव केल्याच्या रागात त्याने संबंधीत पोलीसास मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहरातील गोलाणी मार्केट परिसरात रात्री घडली.

पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल पंकज रामचंद्र शिंदे हे शनिवारी रात्री ८.३० वाजता कमलेश पाटील व भूपेश जोशी या पोलीस कर्मचार्‍यांसोबत गोलाणी मार्केटमधील संतोष ज्यूस सेंटरवर ज्यूस पित होते. या वेळी तेथे मद्यधुंद अवस्थेत आकाश उर्फ आरके गायकवाड (रा. शनिपेठ) हा इतर एका युवकासोबत आला. त्याने ज्यूस सेंटरसमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर रॉड मारुन तिची तोडफोड केली. त्यानंतर पोलिस कर्मचार्‍याच्या दुचाकीवर रॉड मारु लागला. शिंदे यांच्यासह इतर पोलिस कर्मचार्‍यांनी त्याला हटकले. यावर गायकवाड याने पोलिसांशी हुज्जत घालत शिंदे यांच्या डोक्यात रॉड मारला. या वेळी त्याच्यासोबत असलेला युवक पळून गेला. या प्रकारानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम, अशोक पाटील व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी जखमी शिंदे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. गायकवाड याला पोलिसांनी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शहरात पोलिसालाच मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version