Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात पैश्यांच्या वादातून एकाला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेल्या पैश्यांचे व्याज घेण्याच्या कारणावरून ममुराबाद येथील तरूणाला तिघांना मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. तिघांविरोधात शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शरद आत्मराम पाटील (वय-३०) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव हा बसचालक आहे. शरद पाटील यांच्या पत्नीने संशयित आरोपी राहुल भिमराव पाटील आणि योगेश भिमराव पाटील यांच्याकडून ५० हजार रूपये व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान शरद पाटील यांनी ५ हजार रूपये प्रमाणे गेल्या सात महिन्यापासून पैश्याचा परतावा करत होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास फुले मार्केटसमोर शरद पाटील यांना बोलावून आरोपी राहुल भिमराव पाटील, योगेश भिमराव पाटील आणि एकजण यांनी ‘घेतलेले पैसे आजच्या आज दे’ असे सांगून तिघांनी बेदम मारहाण केली, नाहीतर आठ दिवसात टपकावून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीसात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version