Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात पाच गावठी हातभट्ट्या उध्वस्त; अडीच लाखाची दारू नष्ट

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा परीसरात पाच अवैध गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आले असून २ लाख ८५ हजाराचे दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन नष्ट करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहन यांनी दिलेल्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी आपल्या पथकासह आज सकाळी कंजरवाडा परीसरात अवैधरित्या देशी दारूच्या पाच भट्ट्याच्या ठिकाणी जावून कारवाई केली. यात पाचही गावठी हातभट्टी देशी दारूसाठी लागणारे कच्चे व पक्के रसायने असल्याचे समजताच त्यांनी कारवाई करत पाच हातभट्ट्या नष्ट केल्या आहेत. यावेळी सुमारे २ लाख ८५ हाजर २५० रूपये किंमतीचे मुद्देमाल नष्ट केला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल
हिना सचिन बागडे (वय-२५), इंदुबाई उदयसिंग बागडे (वय-५०), राजेश वजीर माचरे (वय-४०), नरगिर हिरा नेतले (वय-३४), अनिता सुधाकर बागडे (वय-५०) सर्व रा. संजय गांधी नगर, सिंगापूर, कंजरवाडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वाठोरे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, हर्षवर्धन सपकाळे, मपोहेकॉ मंदा बैसाने, पोना दिपक चौधरी, मपोना मिनाक्षी घेटे, पोकॉ अशोक सनगत, पोकॉ हेमंत कळसकर, पोकॉ चंद्रकांत पाटील, इम्रान बेग, पोकॉ सतीष चिंचोले, मपोकॉ सपना येरगुंटला यांनी कारवाई केली.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version